कोल्हापूर । गेली वीस वर्षे सामाजिक ,शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या ईगल फाउंडेशनचा सन 2025 चा प्रतिष्ठेचा ‘राज्यस्तरीय गरुड झेप पुरस्कार’ चाटे शिक्षण समूह कोल्हापूरचे सरव्यवस्थापक प्रा. एल.डी. थोरात यांना जाहीर झाला आहे.
सदर पुरस्कार श्री.थोरात यांच्या मागील पंचवीस वर्षातील शैक्षणिक क्षेत्रातील अनमोल योगदानाबद्दल देण्यात येत आहे अशी माहिती ईगल फाउंडेशनचे अध्यक्ष विलासराव कोळेकर यांनी दिली.
प्रा. थोरात गेली 25 वर्ष चाटे शिक्षण समूहाच्या कोल्हापूर कार्यालयात कार्यरत आहेत. या काळात त्यांनी अत्यंत निष्ठापूर्वक व अभ्यासपूर्णरित्या अनेक विद्यार्थी घडविण्याचे कार्य केले आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक मार्गदर्शक उपक्रम त्यांनी राबविले. आपल्या वक्तृत्व शैलीने आणि अभ्यासपूर्ण अशा मार्गदर्शक व्याख्याना द्वारे त्यांनी अनेक विद्यार्थ्यांवर अनमोल संस्कार रुजवले आहेत.
या पुरस्काराबद्दल श्री थोरात यांचे चाटे परिवारातील असंख्य आजी-माजी विद्यार्थी, पालक, सहकारी तसेच मित्रपरिवार व विविध क्षेत्रातील मान्यवराकडून अभिनंदन केले जात आहे.
सदर पुरस्कार प्रदान कार्यक्रम रविवार दिनांक 9 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी दहा वाजता डॉक्टर अण्णासाहेब डांगे इंजिनिअरिंग कॉलेज आष्टा येथे संपन्न होणार आहे.













































































